शुक्रवार, २९ ऑगस्ट, २००८

फ्री डाऊनलोड मॅनेजर

इंटरनेटवरुन मोठ्या आकाराच्या फाईल डाउनलोड करणे तुम्हाला वेळखाऊ व तापदायक वाटत असेल तर फ्रि डाऊनलोड मॅनेजर तुमच्याकरिताच आहे.डाऊनलोड मॅनेजर या सॉफ्टवेअर द्वारा तुम्ही फाईल डाऊनलोड करताना तुमचा निम्मा वेळ वाचवू शकता. याशिवाय यात अशा अनेक सोयी आहेत ज्या तुमच्या करिता उपयुक्त ठरतील.



डाऊनलोड मॅनेजरचे काय काय फायदे आहेत ते जरा पाहू.

  • डाऊनलोड मॅनेजर जी.एन.यु. जनरल पब्लिक लायसंस अंतर्गत उपलब्ध आहे ज्यामुळे ते अगदी १००% मोफत मिळते,शिवाय ते सुरक्षित ही आहे.
  • बिट टोरंटकरिता सहाय्य करते.
  • हव्या त्या ठिकाणी फाईल अपलोड करु शकता.
  • फ्लॅश फाईल्स डाऊनलोड करु शकता.
  • हव्या त्या संगणकावर हलवू शकता(पोर्टेबल).
  • ऑडीओ किंवा विडीओ डाऊनलोड करत असतानाच त्या ऐकू शकता, पाहू शकता व त्याचा फाईल फॉरमॅट बदलू शकता.
  • अगदी कमी डाउनलोडींग स्पिड मध्येही काम करते. डाऊनलोड मॅनेजर फाईलला एकाच वेळी वेगवेगळ्या स्तरावर डाऊनलोड करते ज्यामुळे नेहमीपेक्षा कमी वेळात डाऊनलोडींग पुर्ण होते.
  • डाऊनलोड मॅनेजर मध्ये तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही डाऊनलोड थांबवू शकता व त्याच जागेवरुन पुन्हा नंतर हवे तेव्हा चालू करु शकता.
  • डाऊनलोड मॅनेजर एम.पी.३, विडीओ, सॉफ्टवेअर वा इतर प्रकारच्या फाईल ओळखून त्यांना त्यानुसार वेगवेगळ्या फोल्डरमधे डाऊनलोड करतो.
  • डाऊनलोड मॅनेजर, उपलब्ध असलेल्या इंटरनेट वेगातील तुम्ही सांगाल त्या वेगावर काम करतो.
  • ’साईट एक्सप्लोरर’ या पर्यायाने तुम्ही एखाद्या वेबसाईटचे फोल्डर पाहू शकता व त्यातील हव्या त्या फोल्डरमधील हवी ती फाईल डाऊनलोड करु शकता. (अर्थात त्या वेबसाईटमधे/सर्व्हरमधे प्रवेश करण्याकरिता तुम्हाला आय.डी व पासवर्ड मात्र द्यावा लागेल.)
  • एखाद्या वेबसाईटची हवी ती पाने वा संपूर्ण वेबसाईट तुमच्या संगणकावर डाईनलोड करु शकता.
  • एखादी ’झिप कॉंप्रेस्ड’ फाईल डाऊनलोड करताना त्यातील हव्या त्याच फाईल डाऊनलोड करण्याचीही मुभा आहे.
फ्री डाऊनलोड मॅनेजर इथून डाऊनलोड करता येईल.: http://www.freedownloadmanager.org/download.htm

गुरुवार, २८ ऑगस्ट, २००८

Devanagari Font Problem?

As you are not able to see the Devnagari font used in this site, we have written this article in English to be readable.

If your operating system is Windows XP, you are most probably seeing the Devnagari font used in this site.
If you are not seeing this font please follow this intructions:

Internet Explorer: go to View > Encoding > Unicode (UTF-8)

Firefox: go to View > Charecter Encoding > Unicode (UTF-8)

after doing this, please reload/refresh the page to see the result.

If you are seeing the Wierd Devnagari font on Firefox, you have to install the Complex Script support on your windows operating system.


Please follow these intructions to install the Complex Script support to your Windows XP:

go to Regional and Language Options setting in the Control Panel:

after that select the Language tab. Enable the option "Install files for complex script and right-to-left languages".

You will be asked to insert the Windows Installation CD to complete the installation.

to see the result please restart/reboot your system.

To see the Linux instructions please visit विकिपीडिया:Setting up your browser for Indic scripts

बुधवार, ३० जुलै, २००८

खुलासा

ई विश्व खुलासा करु इच्छीते की,

  • ’ई विश्व” मधे दिल्या गेलेल्या टिपांचा स्वत:च्या जबाबदारीवर वापर करा.
  • ’ई विश्व’ कोणत्याही प्रकारच्या ’सॉफ्टवेअर पायरसी’त अगर ’सायबर गुन्हा’ समजल्या जाणा-या कृत्यामधे भाग घेत नाही किंवा अशा कृत्यांना प्रोत्साहन देत नाही. सदर ब्लॉगमधे प्रसिद्ध झालेले लेख केवळ ’माहीती’ करिता दिले गेले आहेत. त्यांचा वापर करणे अगर न करणे ही पुर्णत: वापरकर्त्याची जबाबदारी आहे.
  • या ब्लॉगमधे प्रसिद्ध झालेले लेखन तुमच्या वैयक्तिक वापराकरिता आहे. ’ई विश्व’ची असे लेखन हस्तांतरीत करण्यास काहीच हरकत नाही. मात्र या ब्लॉगमधील लेखन जसेच्या तसे व्यावसायीक कारणाकरिता किंवा ’ई विश्वला’ त्याचे श्रेय न देता पुन:प्रकाशित करु नये.
  • अधिक माहितीकरिता हे वाचा: Creative Commons Attribution-Noncommercial 2.5 India License.